तरुणाच्या अपघाती मृत्यूबद्दल गुन्हा दाखल

रावेर जि. जळगाव : वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या खिर्डी ता. रावेर येथील तरुणाचा काल सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनला अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी जीवन भास्कर पाटील (41) असे मयत तरुणाचे नाव आहे. जीवन पाटील हे आपल्या शेतातून येत असतांना वाटेत चिंच फाटा ते अजंदा दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या धडकेत वेळेवर मदत मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

संदीप अरुण पाटील यांच्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. बापू पाटील करत आहेत. मयत जीवन पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, व भाऊ असा परीवार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here