नाशिक : भारतातील अमेरिकेचे वाणिज्य दुतावास डेविड रान्झ यांनी आज अचानक सपत्निक नाशिकला भेट दिली. पंचवटीतील काळाराम मंदिरासह तपोवन परिसरात त्यांनी फेरफटका देखील मारला.
27 ऑगस्ट 2019 साली भारतात अमेरिकेचे वाणिज्य दुतावास (कॉन्सल जनरल) म्हणून डेविड रान्झ यांनी पदभार ग्रहन केला आहे. त्यांचे मुंबईला मुख्य कार्यालय आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक कामगिरीसाठी त्यांना सन 2004 मधे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांचा हार्बट सालझमन या पुरस्काराने सन्मान केला आहे. याशिवाय युएस आर्मी कमांडर ऑफ पब्लीक सर्वीसेसचा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला होता.
डेविड रान्झ व त्यांची पत्नी (परराष्ट्र सेवा अधिकारी) टॅली लिंड यांच्यासमवेत नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यावरआज रविवारी 15 नोव्हेंबर रोजी आले होते. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी दिल्यानंतर रामकुंडावर भेट दिली. महंत सुधीरदास पुजारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हे यावेळी हजर होते.
रान्झ यांनी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व तसेच कुंभमेळ्याची माहिती जाणून घेतली. पुरोहित संघ आणि गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी सुरक्षेसाठी योग्य तो बंदोबस्त पुरवला.