जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांची स्थापना केली आहे. त्यांच्या विविध समस्या सोडवणे तसेच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना झाली आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात या संघटनेची भुमिका मोलाची राहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्धीपत्रकान्वये अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी दिली आहे.
या विषयी असोसिएशनचे उद्देश नमुद करतांना लढ्ढा यांनी सांगीतले की जळगाव तालुक्यातील उमाळा -नशीराबाद रस्त्यालगतच्या परिसरात अनेक लहान मोठ्या उद्योजकांनी विविध कंपन्या सुरु केल्या आहेत. जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेकडून उद्योजकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
उदयोजकाच्या विविध समस्या सोडवण्याचा उद्देश या संस्थेचा राहणार आहे. याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी देखील प्रयत्न या माध्यमातून केले जाणार आहे.
जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नामफलकाचे उद्घाटन पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता उमाळा -नशिराबाद रस्त्यानजीक भाग्यश्री पॉलीमर्स समोर होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष सचिन लढ्ढा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, खजिनदार राजीव बियाणी तसेच गणमान्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.