नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली दरम्यान सुरु असलेली रेल्वे व विमानसेवा अद्याप स्थगित करण्याचा विचार नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यसाठी तसेच त्यावर खबरदारी घेवून सर्व बंधने पाळून या दोन्ही सेवा सुरु राहाणार आहेत.
या दोन शहरातील रेल्वे, विमानसेवा स्थगितीचा अद्याप विचार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमानसेवा तसेच रेल्वेसेवा काही कालावधीसाठी स्थगित केली होती. नंतर रेल्वेसेवा आणि देशांतर्गत विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरु केली जात आहे.
वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत भारतासह इतर देशात आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा सुरु असली तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित सुरु झालेली नाही