नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयातील आयसीयु मधे दाखल केले होते. गेल्या महिन्यात त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती.
अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आज 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजता त्यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे, असे त्यांचे पुत्र फैजल यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करु नये असे देखील त्यांनी म्हटले आहे.









