इंदोरीकर महाराज केसमधून सरकारी वकिलांंची माघार

इंदोरीकर महाराज

संगमनेर (अहमदनगर) : निवृत्ती काशीनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरुन संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्यातून सहायक सरकारी अभोयोक्ता अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांच्याकडून माघार घेण्यात आली आहे.

या खटल्याचे कामकाज पाहण्याची आपली इच्छा नाही मात्र आपली बदनामी करणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचे अ‍ॅड. कोल्हे यांनी म्हटले आहे. इंदोरीकर महाराजांविरुद्ध फिर्याद दाखल करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांच्या वतीने सहायक अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. कोल्हे न्यायालयीन कामकाज बघत आहेत. आता हे कामकाज बघण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी कार्यालयास लेखी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here