जळगाव : आज सकाळपासून पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील बिएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह त्यांच्याशी संबधित प्रतिष्ठानांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. आज दिवसभर जळगाव शहरासह जिल्ह्यात बीएचआर पतसंस्थेवरील छापेमारी हा एकच चर्चेचा विषय राहिला आहे.
बीएचआरच्या पुणे शाखेत सर्वप्रथम सुमारे 2200 कोटी रुपयांच्या बेनामी ठेव प्रकरणाचे भांडे फुटले. तेथे अनेक नट नट्या बेनामी ठेवीदारांची शेकडो कोटींच्या ठेवी ठेवल्याचे रेकॉर्ड खोटे असल्याची तक्रार सहकार विभागाकडे करण्यात आली होती. राज्य सहकार विभाग निबंधक कार्यालयाचे अधिकारी यांनी अधिक चौकशी करता प्रथम तपासणीत शेकडो कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार दिसून आला. त्यामुळे या संस्थेचे व्यवस्थापक मंडळ – संचालक या शाखेकरवी “मनी लॉंडरींग” बेकायदा हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या संशयास्पद हजारो कोटी रुपयातून दहशतवादी कारवायांना “टेरर फंडींग” होत असावा असा देखील संशय तपास अधिका-यांनी व्यक्त केला होता. या संस्थेच्या ठेवीदारांच्या भांडवल शक्तीतून संस्था चालक अध्यक्षाने त्यांचा पुत्र किंवा जावयास पुण्यात होल्सवॅगन फोर व्हिलर्सची डीलरशीप मिळवून देण्यात आली असे म्हटले जाते.
शिवाय पुढील काळात बीएचआर संचालक मंडळाविरुद्ध राज्यातील अनेक पोलिस स्टेशनमधे तक्रारींचा पाऊस पडला. परिणामी संचालक मंडळ अनेक महिन्यांपासून जेलच्या वा-या करत आहेत. बीएचआर च्या तक्रारी प्रकरणी ठेवीदार सरंक्षण समिती तथा जनसंग्रामचे विवेक ठाकरे, पाळधी स्थित एक उद्योजक झवर यांच्याकडेही चौकशीचा मोर्चा वळला आहे. याशिवाय काही राजकीय पुढा-यांनी काही कोटी रुपयांची कर्जे उचलली. त्यापैकी एकाने सुमारे 25 ते 40 कोटी उचलल्याचे समजते. जेव्हा पतपेढ्यांच्या मल्टीस्टेट अवताराविरुद्ध जिल्ह्यातील तत्कालीन खासदार ए.टी.पाटील, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याकडे ठेवीदारांनी लेखी तक्रारी दिल्या. त्यावेळी म्हणजे सन 2014 ते सन 2019 पर्यंत त्यांनी काही एक कारवाई केली नाही. केवळ बीएचआर नव्हे तर बोरोले यांची तापी पतपेढी आणी बढे यांची पतपेढी या दोन पतपेढ्या राज्यभरात प्रत्येकी शंभराहून अधिक शाखा असणा-या पतसंस्थांच्या तक्रारींवर जिल्ह्यातील खासदार आणी आमदार गप्प बसून राहिले.
भुसावळ येथील तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांनी ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली होती. बीएचआरचे अवसायक कंडारे यांनी ठेव पावतीच्या बदल्यात 35 ते 50 टक्के परताव्याचे व्यवहार केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. याकामी अनेक दलाल सक्रीय झाले होते. बीएचआर च्या तक्रारी थांबवण्यासाठी काही दलालांनी दहा कोटी रुपयांचे मांडवलीचे प्रस्ताव पाठवल्याचे देखील समजते.
सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव)
8805667750
लोकांचे पैसे कसे मिळेल तो पर्यंत पुर्ण बॉडी लॉकअप ठेवा सर्व एस्टेटची चौकशी केंद्र सरकार मार्फत व्हावी