उद्या 8 रोजी भारत बंदची हाक

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लोक संघर्ष मोर्चा, कामगार सघंटना कृती समितीची बैठक आज सोमवार दि. 7 डिसेंबर रोजी अजिंठा शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी जिल्ह्यात 8 डिसेंबर रोजी सर्वांनी अन्नदात्यासाठी एक दिवसीय संपाचे नियोजन केले.

केंद्र सरकारचे तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय देशातील प्रमुख दहा केंद्रीय कामगार सघंटना तसेच स्वतंत्र फेडरेशनसह विविध राजकीय विरोधी पक्षाने घेतला आहे. भारत बंद मध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच डावे पक्ष देखील सहभागी होणार आहे. लोक संघर्ष मोर्चा व कामगार सघंटना सयुंक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) महाराष्ट्रभर बंद मध्ये सहभागी होणार असून निदर्शने करणार आहे.

जळगाव जिल्हयात बंद यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, लोक संघर्ष मोर्चा, कामगार संघटनांची आघाडी, अनेक पुरोगामी संघटना आदींची बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात झाली. या बैठकीस लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मुकुंद सपकाळे, अभिषेक पाटील, शरद तायडे, गफ्फार मलिक, शाम तायडे, जमील शेख, सुरेंद्र पाटील (मराठा सेवा संघ) , विलास पाटील, भारत ससाणे (वंचित), अमोल कोल्हे (छावा) विजय सुरवाडे (बहुजन क्रांती मोर्चा) साजिद शेख (समाजवादी पार्टी), शालीग्राम मालकर ( माळी महासंघ) , विजय पवार (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) ॲड सचिन पाटील व अड सचिन सिघ, फारुख शेख, प्रमोद पाटील ,सचिन धांडे,विष्णू भंगाळे, आय्याज अली, प्रा.करीम सालार, अशा तिस संघटना व पक्षांचे प्रतिनिधी यावेळी सहभागी झाले होते.

जळगाव जिल्ह्यात आठ डिसेंबर मंगळवार रोजी कडकडीत बंद पाळण्याचा निर्धार यावेळी सर्व पक्ष संघटनांच्या वतीने घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिक व्यापारी संघटना, बाजार समिती, ट्रक असोसिएशन, रिक्षा चालकाची संघटना हमाल मापडी संघटना यांना बंद सर्व पुरोगामी संघटनांच्या व पक्ष च्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी पक्ष व लोक संघर्ष मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सकाळी नऊ वाजता टॉवर चौकातून मोटार सायकल रॅली काढून बंदचे आवाहन करणार आहे. जिल्हाधिका-यांना संयुक्त किसान मोर्चा, महविकास आघाडीतील सर्व पक्ष व लोक संघर्ष मोर्चा, कामगार सघंटना पदाधिकारी निवेदन देणार आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, लोक संघर्ष मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात कामगार सघंटनानी भागीदारी करत संपूर्ण बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here