संसद भवनाच्या नव्या बांधकामास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली : संसद भवनाच्या नविन वास्तुच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असतांना केंद्र सरकार संसद भवनाचे बांधकाम कसे काय करु शकते असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

असे असले तरी 10 डिसेंबर रोजी या बांधकामाचे भुमीपुजन करण्यास हरकत नसल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. या नव्या वास्तुचा भुमीपुजन सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडत न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोणतेही बांधकाम होणार नसल्याची हमी न्यायालयास दिली. सध्या सुरु असलेल्या संसद भवनाच्या जवळच या नवीन इमारतीचे बांधकाम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here