अहमदाबाद : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी बांधवांनी 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ चे आवाहन केले आहे. गुजरात राज्यातील 23 शेतकरी संघटनांनी मिळून गुजरात खेडूत संघर्ष समिती नावाची संघटना निर्माण केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून उद्याच्या भारत बंदला पाठींबा दिला आहे.
मात्र गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी उद्याच्या भारत बंदला गुजरातचे समर्थन नसल्याचे म्हटले आहे. कुणी बंद साठी साक्ती करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देखील गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने केलेल्या या कृषी कायद्याचा विरोध आता राष्ट्रीय आंदोलन झाले आहे. या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे.