अनाथ बालगृह अधिक्षीकेसह तिच्या मुलास दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

legal

नाशिक : अनाथ मुलींच्या बालगृह अधिक्षीकेसह तिच्या मुलास नाशिक सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायधिशांनी दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

काझीपुरा ता. पेठ जिल्हा नाशिक येथील अनाथ मुलींच्या बालगृह अधिक्षीका सुशिला शंकर अलबाड(52) तसेच त्यांचा मुलगा अतुल शंकर अलबाड (35) असे शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत.

अनाथ मुलींच्या बालगृह अधिक्षीका असलेल्या सुशिला अलबाड यांच्या कार्यालयात त्यांचा मुलगा अतुल शंकर अलबाड याने सन 2015 मधे दिवाळी सणाच्या वेळी बोलावले होते. पिडीत मुलगी कार्यालयात आली असता तिच्यावर त्याने बळजबरी अत्याचार केला होता. हा प्रकार पिडीत मुलीने अधिक्षीका सुशिला अलबाड यांना सांगीतला होता. मात्र तिचे म्हणणे खोटे ठरवून तुच माझ्या मुलाच्या मागे लागली असे म्हणून पिडीत मुलीस अधिक्षीकांनी मारहाण केली होती.

या प्रकरणी पेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 34/17 भा.द.वि. कलम 376 क, 376 (2), 323, 506, 34 सह पोस्को 3, 4, 7, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास तत्कालीन स.पो.नि. श्रीमती कमलाकर यांनी केला होता. त्यांनी आरोपीतांविरुद्ध भक्कम पुरावे जमा करुन नाशिक सत्र न्यायालयात चार्ज शिट दाखल केले होते.

नाशिक सत्र न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एस.नायर यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज पुर्ण झाले. या गुन्हयातील आरोपी अतुल शंकर अलबाड (35) व सुशिला शंकर अलबाड (52) दोन्ही राहणार अनाथ मुलींचे बालगृह, कापुरझीरा, ता.पेठ, जि.नाशिक यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाले.

आरोपी अतुल अलबाड यास पोस्को क 5 (ड) नुसार दहा वर्ष सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तिन महिने साधी कैद व भा.द.वि. कलम 506, 34 नुसार दोन वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

आरोपी सुशिला अलबाड हिस पोस्को क 1 (ड) नुसार दहा वर्ष सक्त मजुरी तसेच 20 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महिने साधी कैद व भा.द.वि. 506, 34 नुसार दोन वर्ष साधी कैद याप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here