मुंबई : विधानसभेपुर्वी रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठविल्याची ओरड झाली होती. आता तशीच नोटीस एकनाथराव खडसे यांना पाठवण्यात आली आहे. इडीची ही नोटीस नेमकी कोणत्या संदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुणे येथील जमीनीचा घोटाळा की अजून काही ते लवकरच स्पष्ट होईल. मात्र ईडी आणि सीडीचे राजकारण रंगत आहे.
बीजेपीतून रा.कॉ.त गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्ताने राजकीय वारे जोरात वाहू लागले आहे. बीजेपीने हुकुमशाही सुरु केली असून आता खडसेंना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर सीडी देखील लवकरकच निघणार असल्याचा इशारा रा.कॉ.नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
ज्यादिवशी एकनाथराव खडसे यांनी रा.कॉ. पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देणार असल्याचे म्हटले होते. मात्र ज्यावेळी ते ईडी पाठवतील तेव्हा मी सीडी दाखवेन असे खडसे यांनी म्हटले होते. आता सीडी देखील निघणार असून हुकुमशाही राजकारणाला कुठलाही अर्थ नसल्याचे रा.कॉ.नेते मिटकरी यांनी म्हटले आहे.