जळगाव : भोसरी भूखंड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून शनिवारी एकनाथराव खडसे यांना नोटीस मिळाली आहे. 30 डिसेंबर रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात त्यांना बोलावण्यात आले आहे.
चौकशीकामी आपण सर्व प्रकारे सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली आहे. या प्रकरणी ही पाचवी चौकशी असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित आपल्या नावाने ही नोटीस आली असावी असेही खडसे यांनी म्हटले आहे.