मुंबई : रा.कॉ.चे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. बलात्काराच्या आरोपाला अनुसरुन विरोधकांकडून मुंडेवर होणारी टिका या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी धनंजय मुंडे दाखल झाले आहेत.
धनंजय मुंडे हे या प्रकरणी आपली बाजू यावेळी मांडणार असल्याचे म्हटले जात आहे. बलात्काराच्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे.
धनंजय मुंडे यांची बलात्कार प्रकरणी चौकशी पुर्ण झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार हे धनंजय मुंडे यांना कोणता सल्ला देतात याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागून आहे.
भाजपचे विविध नेते मात्र या प्रकरणाला अनुसरुन हल्लाबोल करण्याची संधी सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. हा तपास तपास सीबीआय अथवा निवृत्त न्यायाधीश समितीकडे सोपवण्यासह शर्मा भगिनींना संरक्षण मिळावे, दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याने तसेच त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला नसल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे. यासह द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले. यासह विविध प्रकारची आक्रमक भुमिका विरोधी पक्ष भाजपाकडून घेतली जात आहे.