मुंबई : रा.कॉ. चे नेते धनंजय मुंडे सध्या बलात्कार प्रकरणी चर्चेत आहेत. ज्या ललनामुळे हा प्रकार चर्चेत आला ती ललना मला देखील कॉल व मेसेज करायची असा आरोप आता भाजपाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला आहे. हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे.
ती तरुणी मला देखील रिलेशनशिपच्या हनीट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती असा खळबळजनक दावा हेगडे यांनी केला आहे. सन 2010 ते 2015 या कालावधीत ती ललना मला सारखी कॉल आणि मेसेज करत होती. मात्र आपण तिची भेट घेणे टाळले असे हेगडे यांनी म्हटले आहे. बाहेरुन केलेल्या चौकशी दरम्यान त्या तरुणीने इतरांना देखील फसवल्याची माहिती आपणास मिळाली असल्याचे हेगडे यांचे म्हणणे आहे. तशी माहिती त्यांनी मुंबई पोलिसांना दिली असून त्याबाबत सखोल चौकशी करण्याचे पत्रात म्हटले आहे.