एकनाथराव खडसेंची साडे सहा तास ईडीकडून चौकशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची आज ईडीकडून जवळपास साडे सहा तास चौकशी झाली. आज सकाळीच एकनाथराव खडसे ईडीच्या कार्यालयात आपली कन्येसह हजर झाले होते. जवळपास साडे सहा तास त्यांची चौकशी झाली. या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी आपण ईडीला चौकशीकामी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले. ईडीला जी काही कागदपत्रे लागतील ती आपण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथराव खडसे यांना ईडीने 30 डिसेंबर रोजी चौकशीकामी हजर राहण्यासाठी समन्स बोलावले होते. त्याच कालावधीत त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे एकनाथराव खडसे क्वारेंटाइन झाले होते. 14 दिवसांनंतर 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. चौकशी दरम्यान त्यांच्या कन्येची देखील चौकशी झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here