मुंबई : सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु असतानाच एमपीएससीकडून याचिका दाखल करण्यत आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्र्यांनी याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका एमपीएससी कडून मागे घेतली जाणार आहे.
न्यायालयात दाखल याचिका मागे घेण्या बाबतचे निर्देश एमपीएससीकडून वकिलांना देण्यात आले आहेत. सदर याचिका परस्पर दाखल करत एसईबीसी उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यत आली होती. आता एमपीएससीने वकिलांना ही याचिका मागे घेण्याचे निर्देश दिले आहे.