मिडीयाला बातम्यांचे पैसे द्या….. ऑस्ट्रेलियाचा गुगल, फेसबुकला इशारा

गुगल, फेसबुकसह इतर तंत्रज्ञान कंपन्यांनी मिडीयाला त्यांच्या बातम्या वापरण्यासाठी पैसे दिले जावेत असे विधेयक ऑस्ट्रेलियात मांडण्यात आले आहे. असे झाल्यास ऑस्ट्रेलियातून सर्च इंजिन मागे घेण्याचा गर्भित इशारा गुगलकडून देण्यात आला आहे.

स्थानिक सेवेसाठी असलेल्या अ‍ॅक्सेसवर या बाबीचा परिणाम होईल असे गुगलचे म्हणणे आहे. मात्र अशा धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे म्हणणे आहे.

ऑस्ट्रेलियातील या होवू घातलेल्या विधेयकामुळे गुगलसह फेसबुकला बातम्यांच्या वापराकरीता मिडीयासोबत अगोदर करार करावा लागेल. या विधेयकाचे कायद्यात परिवर्तन झाल्यास ऑस्ट्रेलियातील गुगल सर्चची उपलब्धता बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल असे गुगलच्या वतीने सिल्व्हा यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here