अहमदनगर : केंद्र सरकार चालवणा-या भाजप सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी इशारा दिला आहे. दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचे केंद्रासाठी त्रासदायाक ठरु शकते. त्यासाठी भाजपकडून अण्णांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील राळेगणसिद्धी येथे अण्णांच्या भेटीला दाखल झाले. दोघा नेत्यांनी अण्णांचे उपोषण स्थगीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी गिरीश महाजन देखील हजर होते.
केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून देण्यात आलेले पत्र फडणवीसांनी दिले, त्यावर चर्चा देखील झाली मात्र तोडगा काही निघाला नसल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे जुने व्हिडीओ अण्णा प्रसारीत करणार असल्याचे म्हटले जात आहे.