बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण

On: January 23, 2021 8:41 AM

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी सहा वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या इमारतीनजीक असलेल्या महात्मा गांधी मार्ग, फोर्ट याठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिकेतील विविध पदाधिकारी, स्थानिक खासदार अरविंद सावंत, आ. रामदास कदम, आ. भाई जगताप, स्थानिक आ. राहुल नार्वेकर यांच्यासह महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment