बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्साहात

On: January 23, 2021 7:37 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा कुलाबा येथे आज उत्साहात झाला. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतुक बेटामधे हा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीदिनी हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

उंचीला 9 फूट आणी वजनाला 1200 किलो ब्राँझ धातूपासून तयार केलेला हा पुतळा जेष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी उभारला आहे. रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. अध्यक्षस्थानी महापौर किशोरी पेडणेकर होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment