खा. रक्षा खडसे यांचा वेबसाईटवर चुकीचा उल्लेख

मुंबई : बिजेपीच्या अधिकृत वेबसाईटवर एक घोडचुक झाली असल्याचे म्हटले जात आहे. रावेर मतदार संघाच्या बिजेपी खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल पक्षाच्या वेबसाईटवर “होमोसेक्सुअल” असे लिहीलेला एक स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. सायबर सेल पुढील योग्य ती कारवाई करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

बिजेपीच्या मान्यताप्राप्त वेबसाईटवर देशातील खासदारांची माहीती देण्यात आली आहे. या माहितीमधे खासदारांचे नाव आणि फोटोसह मतदारसंघाचे वर्णन देण्यात आले आहे. या वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या बाबतीत होमोसेक्सुअल असे लिहिल्याचा स्क्रीनशॉट सर्वत्र प्रसारीत झाल्याचे दिसून आले आहे.

आता त्यात दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगीतले जात असून चुक दुरुस्त केली असल्याचे दिसून येत आहे. रावेर या नावाचे गुगल मधे हिंदी भाषांतर करतांना ती चुक झाली असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here