मुंबई महापालिकेची इमारत आता पर्यटकांसाठी होणार खुली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची टोलेजंग इमारत पर्यटकांसाठी खुली होणार आहे. शनिवार, रवीवारसह प्रत्येक सुटीच्या दिवशी या इमारतीचे वैभव पर्यटकांना आतून बघता येईल. आज 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होत आहे. दिडशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या भव्यदिव्य इमारतीचे पर्यटन सफर सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे.

मनपा सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here