राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्याकरीता व दिल्ली येथील शेतकरी बांधवांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसू नये म्हणून भाजप नेते प्रयत्नशील आहेत.
आज सहाव्यांदा भाजप नेते अण्णांच्या भेटीला गेले. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्णयापासून परावृत्त होण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील बैठकीचा ड्राफ्ट अण्णा हजारे यांना देवूनही अण्णा मात्र उपोषणाच्या निर्णयावर कायम आहेत. अण्णांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे.
आतापर्यंत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. राधाकृष्ण विखेपाटील, आ. गिरीष महाजन आदींनी भेट घेवून देखील नकारघंटा बदलण्याचे चित्र कायम आहे. आज पुन्हा संकटमोचक म्हणवले जाणारे गिरीष महाजन अण्णांच्या भेटीला जावुन आले. मात्र अजूनही तडजोडीचे चित्र धुसर आहे.