पारनेर : उद्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणास बसणार असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी व दिल्लीतील आंदोलनास पाठींबा देण्यासाठी अण्णा उपोषणास बसणार आहेत. अण्णांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी केंद्राने उच्चाधिकार समिती तयार केली आहे. या समीतीचे प्रारुप आज ठरणार आहे. या समितीत सरकारचे तिन व सिव्हील सोसायटीचे तिन असे एकुण सहा प्रतिनिधी असतील.