गृहमंत्र्यांसोबत सराईत गुन्हेगारांचा(?) फोटो चर्चेत

गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबाद दौ-यावर आले असतांना त्यांचा सत्कार करण्यासाठी विविध घटकातील लोकांची झुंबड उडाली होती. सत्कार करणारा जवळपास प्रत्येक जण आपला फोटो कॅमे-यात कैद करुन घेण्याची चोख व्यवस्था करुनच सत्कार करत असतो हे जगजाहीर आहे. नेत्यांसोबत काढलेल्या फोटोची प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रसिद्धी करुन त्याचे भांडवल करत असतो. फोटो काढू देण्यासाठी नेते देखील सरावलेले असतात. सराईताप्रमाणे नेत्यांना देखील फोटो काढण्याचा आणि काढू देण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. मुद्दाम नेत्याजवळ जावून बोलतांना काढलेल्या फोटोबाबत नंतर अमुक प्रश्नावर चर्चा करतांना ….. अशी प्रसिद्धी त्याला दिली जाते.

औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आले असताना त्यांच्यासोबत तिन गुन्हेगारांचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारी उभे असलेल्या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे म्हटले जात आहे.

एका जणावर पाचशे ट्रक चोरीसह त्या ट्र्कच्या सुट्या भागांची विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल असल्याचे म्हटले जात आहे. फोटोतील दुस-यावर बलात्कारासह इतर गुन्हे दाखल असून तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित असल्याचे म्हटले जात आहे. तिस-यावर गंभीर स्वरुपाचे काही गुन्हे दाखल असल्याचे म्हटले जात आहेत.
नेत्यांसोबत फोटो काढण्यासाठी इच्छुक हौशी मंडळींची पार्श्वभुमी काय आहे याची पडताळणी होणे देखील गरजेचे असल्याचे या निमित्ताने म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here