जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन यांनी आज मध्यरात्री एक वाजता अखेरचा श्वास घेतला. एरंडोल विधानसभा मतदारसंघातून ते सन 1990 मधे निवडून आलेले शिवसेनेचे प्रथम आमदार होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. कालांतराने त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.