धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

On: February 3, 2021 5:47 PM

मुंबई : बलात्काराच्या वादात सापडलेले सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र बलात्काराचा आरोप करणा-या त्या महिलेने पुन्हा मुंडे यांना अडचणीत आणले आहे. त्या महिलेने मुंबई पोलिस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

मागील तिन महिन्यांपासून आपल्या दोघा मुलांना मुंडे यांनी त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवले असून त्यात चौदा वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याचे महिलेने म्हटले आहे. पोलिसांनी सहकार्य केले नाही तर येत्या 20 तारखेपासून मुंडे यांच्या चित्रकुट बंगल्यासमोर अथवा आजाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्या महिलेने दिला आहे.

मुलांची भेट घेण्यासाठी 24 जानेवारी गेले असता आपल्याला काही पोलिसांनी हाकलून लावल्याची तक्रार तिने केली आहे. मुंडे आपल्यासोबत अश्लील वर्तन करत असल्याचे त्या महिलेने पोलिस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment