प्रियंंका गांधींच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

On: February 4, 2021 10:55 AM

रामपूर : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत मरण पावलेल्या शेतक-याच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी जात असतांना कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एकापाठोपाठ अनेक वाहने एकमेकांवर आदळली. यात प्रियंका गांधी यांना दुखापत झालेली नाही.

प्रियंका गांधी आज पहाटे उत्तर प्रदेशातील रामपुरच्या दिशेन जात होत्या. त्यावेळी त्यांच्या कारमधील वायफरचे पाणी संपले असतांना चालकाच्या समोरील काच धुसर झाली होती. त्यामुळे चालकाला पुढील काही दिसत नव्हते. त्यातच चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ताफ्यातील मागच्या अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment