मद्रास : बंद खोलीत स्त्री व पुरुष एकत्र आढळून आल्यास त्यांच्यातील संबंध अनैतीक समजणे चुकीचे असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
सशस्त्र रिझर्व्ह पोलीस दलात काम करणा-या सरवण बाबू या कर्मचा-याच्या सुनावणी दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. नैतीकतेच्या आधारे त्याला कामावरुन कमी करण्यात आले होते. अनैतीकतेच्या निष्कर्षावर एखाद्यावर अशा स्वरुपाच्या शिक्षेची अथवा दंडातमक कारवाई केली जावू शकत नसल्याचे मत न्या. आर. सुरेशकुमार यांनी नोंदवले आहे.
सन 1998 मधे एक महिला पोलिस कर्मचारी तिच्या घराची चावी शोधण्यासाठी शेजारी राहणा-या सरवण बाबू या पोलिस कर्मचा-याकडे आली होती. दरम्यान तिच्या शेजारचे तिच्या घरी आल्यावर सरवन बाबूच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. ती महिला कर्मचारी व सरवण बाबू यांच्यात अनैतीक संबंध असल्याबाबत त्यांना संशय आला. कुणीतरी अगोदरच दरवाजा लावून घेतला व त्यानंतर दरवाजा ठोकण्याचे नाट्य केल्याचा दावा सरवण बाबू या कर्मचा-याने न्यायालयात केला.
दोघात कोणत्याही स्वरुपाचे अनैतीक संबंध असल्याचे पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे सरवण बाबूचा दावा मद्रास उच्च न्यायालयाने मान्य करत निकाल दिला.