खडसेंच्या याचिकेवरील सुनावणीस पुढील तारीख

On: February 4, 2021 5:09 PM

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या दाखल याचिकेवर सुनावणीसाठी पुढील तारीख मिळाली असून आता पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आज या याचिकेवर कामकाज झाले. खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याचे कारण दाखवण्यात आले असून न्यायालयास वेळ मागून घेण्यात आला. त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्या पुढील सुनावणीचे कामकाज आता 17 फेब्रुवारी रोजी होईल.

सदर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होईल तोवर खडसे यांना संरक्षण मिळेल. या प्रकरणी सुनावणी होत नाही तोपर्यंत खडसे यांच्याविरुद्ध ईडीला कारवाई करता येणार नसल्याचे दिसत आहे. ईडीने खडसे यांच्याविरुद्ध इसीआयआर दाखल केला आहे. तो रद्द होण्यासाठी खडसे यांनी याचिका दाखल केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment