काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आसिफ खान यांचे अपघाती निधन

On: February 10, 2021 9:51 AM

जळगाव : कार व ट्रक यांच्यात झालेल्या जबर धडकेत कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आसिफखान इस्माईल खान (मुक्ताईनगर) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या सोबत प्रवासात असलेले मुक्ताईनगर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव व अ‍ॅड. संतोष इंगळे (मेळसांगवे) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना शहरातील एका खासगी दवाखान्यातील आयसीयु मधे वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद येथील कामकाज आटोपल्यानंतर आसिफखान, आत्माराम जाधव व अ‍ॅड. संतोष इंगळे असे तिघे जण मंगळवारच्या रात्री कारने जालनामार्गे मुक्ताईनगरच्या दिशेने प्रवास करत होते. रात्री साडेनऊ वाजता जालना – खिंदखेडराजा मार्गावर त्यांच्या चारचाकी वाहला एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्या धडकेत आसिफ खान जागीच मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबत असलेले आत्माराम जाधव आणि अ‍ॅड. संतोष इंगळे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील डॉ. जगदीश पाटील यांच्या दवाखान्यात उपचार सुरु असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment