राजकारणात येण्यापुर्वी वैमानिक असलेले माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीष शर्मा यांचे गोव्यात निधन झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कॅन्सरसोबत लढा देत होते. सतिष शर्मा यांचे गांधी परिवारासोबत जवळचे संबंध होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्ष होते. शर्मा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
कॅप्टन सतीश शर्मा तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. नरसिंह राव सरकारच्या कालावधीत त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. शर्मा यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षासह सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.