माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई – लेंगिक शोषण प्रकरण रद्दबातल

On: February 18, 2021 6:37 PM

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध “स्यु मोटो” स्वरुपातील दाखल असलेले लैंगिक शोषणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्या. संजय किशन कौल यांच्या खंडपीठासमक्ष आज या प्रकरणी सुनावणी पुर्ण झाली. त्यांनी हे प्रकरण रद्दबातल केले आहे.

गोगोई यांच्या कार्यालयात काम करणा-या महिलेकडून त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या 22 न्यायमुर्तींनी चौकशी करावी अशी मागणी माजी सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी केली होती. या चौकशीकामी त्रिसदस्यीय समीती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याविषयी बराच वाद झाला होता. अखेर संजय कौल यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हे प्रकरणच रद्द केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment