नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हिंदु महिला तिच्या संपत्तीवर वारस म्हणून माहेरकडील सदस्यास लावू शकते. तिच्या माहेरच्या सदस्याला कुटूंबातील सदस्य मानले जाईल. हिंदु उत्तराधिकार कायदा 1956 च्या कलम 51.1ड नुसार सर्व नियम वारस हक्कासाठी लागू राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय देण्यात आला आहे.
याचिकाकर्त्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या नावे असलेली संपत्ती तिने तिच्या भावाच्या मुलांच्या नावावर केली होती. त्यानंतर तिच्या पतीच्या भावांनी या प्रकाराला आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेत याचीका दाखल केली. सदर याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर त्या महिलेचे दिर व सासरकडील मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पीठाने निर्णय देताना म्हटले आहे की सदर महिलेच्या माहेरचे सदस्य हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या कलम 51.1 ड नुसार वारसा हक्कात येतील. कलम 13.1 ड मधे म्हटले आहे की माहेरच्या सदस्यांना संपत्तीत वारस समजले जाईल. जे संपत्तीमध्ये वारस मानलेले असतात ते परिवारातील सदस्य मानले जातात.