युपीएससी परिक्षार्थींना आता दिलासा नाही – सर्वोच्च न्यायालय

On: February 24, 2021 1:37 PM

नवी दिल्ली : कोरोनामुळे नागरी सेवा परिक्षेस मुकलेल्या परिक्षार्थींना आता वयोमर्यादेत दिलासा मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयाचा फटका सुमारे दोन हजार परिक्षार्थी उमेदवारांना बसणार आहे.

युपीएससीमार्फत घेण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेला कोरोनामुळे मुकलेल्या परीक्षार्थींना वयाच्या अटीमुळे पुन्हा संधी मिळणार नसल्यामुळे त्यांना एक संधी द्यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमक्ष याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालय धोरणात्मक बाबींमध्ये सरकारला आदेश देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment