मुंबई : वादाच्या भोव-यात सापडलेले पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण संजय राठोड यांचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे दिसुन येत आहे. पुजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्यवर राजीनामा देण्याची वेळ आली. दरम्यान पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे तिच्या आईवडीलांचे म्हणणे होते. असे असले तरी पूजा चव्हाणची चुलत आजी शांता राठोड हिने थेट पुजाच्या आईवडीलांवर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. संजय राठोड यांच्याकडून पुजाच्या आईवडीलांनी हे पाच कोटी रुपये घेतल्याचे शांता राठोड यांचे म्हणणे आहे. पुजाचे आईवडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभुल करत असल्याचे देखील शांता राठोड यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पुजाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती शांता राठोड यांनी केली आहे.