पिडीतेशी विवाह करणार काय? जळगावच्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल?

जळगाव येथील राज्य सरकारी कर्मचा-याविरोधातील बलात्काराचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आहे. पिडीतेशी विवाह करणार काय? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सदर आरोपीस केली आहे. याप्रकरणी पुढील चार आठवडे या संशयीतास अटक करु नये अशा सुचना देखील न्यायालयाने दिल्या आहेत.

पिडितेसोबत विवाह केल्यास न्यायालयाची मदत मिळेल अन्यथा सरकारी नोकरी गमावून तुरुंगात जाण्याची वेळ येणार असल्यामुळे आरोपी द्विधा मनस्थितीत सापडला आहे. दरम्यान चार आठवडे आरोपीस अटक करु नये अशा सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील तिघा न्यायाधीशांच्या खंडपीठाने संशयीत आरोपीला वरील प्रश्न विचारला आहे. मोहित सुभाष चव्हाण असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here