नागपूर : दुस-या पत्नीचा पोटगीसाठी आलेला अर्ज सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फेटाळला आहे. घटस्फोट घेतला नसतांना दुसरे अवैध लग्न केले असतांना पत्नीला पोटगी देता येणार नसल्याचा निकाल नागपुर खंडपीठाने दिला आहे. न्या. अतुल चांदुरकर आणि पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठासमक्ष ही सुनावणी पुर्ण झाली.
रोहन आणि सुधा (काल्पनिक नावे) यांनी 13 मे 2007 रोजी विवाह केला होता. रोहनचा सुधासोबत हा दुसरा विवाह असला तरी त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नव्हता. काही दिवसांनी रोहन आणि सुधा यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला विवाह शाबुत असल्यामुळे सुधा सोबत झालेले त्याचा दुसरा विवाह अवैध ठरला. 6 एप्रील 2009 नंतर रोहन व सुधा विभक्त झाले.
त्यानंतर पोटगीसाठी सुधाने कुटूंब न्यायालयात याचीका सादर केली. न्यायालयाने सुधाचा रोहनसोबत झालेला विवाह अवैध ठरवत पोटगी देण्यास नकार दिला. तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने देखील कुटूंब न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि तिचे अपिल फेटाळले.