राष्ट्रपती राजवटीची मागणी आजपासून करणार – सुधीर मनगुंटीवार

On: March 3, 2021 4:14 PM

मुंबई : जळगाव येथील महिलांच्या शासकीय वसतीगृहात मुलींना निर्वस्त्र होवून नृत्य करण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. विरोधी पक्षाने सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात याप्रकरणी गदारोळ माजवला आहे.

आपण आजपासून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आपल्या माता भगिनी सुरक्षीत नसतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचा इशारा सुधीर मनगुंटीवार यांनी दिला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हटले की या निंदनीय घटनेची व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. या मुलीला विवस्त्र करुन पोलिस नाचवत असल्याचे व्हिडीओ क्लिपमधे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान या घटनेची चौकशी सुरु असून दोन दिवसात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment