पिंपरी : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांना पोलिसांनी एक नोटीस बजावली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी श्री श्री रविशंकर यांना ही नोटीस बजावली आहे.
श्री श्री रवीशंकर यांनी एका यु ट्युबवर एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. त्या व्हिडीओत त्यांनी समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दर्शवले होते. या व्हिडीओची दखल घेत संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे हे आक्रमक झाले असून त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. श्री श्री रविशंकर यांना एक नोटीस पाठवण्यात आली असून त्यामाध्यमातून खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे. सतिश काळे यांनी यापुर्वी विविध स्तरावर कारवाईसाठी निवेदन देखील दिले आहेत.