महिला वसतीगृहात एकही पोलिस कर्मचारी जाऊ शकत नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – आशादीप महिला वसतीगृहाच्या वृत्तामुळे राज्यभर जळगाव शहराच्या नावाची चर्चा झाली. याप्रकरणी थेट विधीमंडळात विरोधकांनी गदारोळ माजवला. चर्चा झाली. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून खुलासा सादर केला जाईल असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.

या महिला वसतीगृहात पोलिस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचे गृहमंत्री यांनी म्हटले आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार या महिला वसतीगृहात सतरा महिला वास्तव्याला आहेत. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात मनोरंजनाचा कार्यक्रम सुरु होता. या ठिकाणी कुठलेही दुष्कृत्य झाले नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. तिच्या पतीने अनेकदा सांगीतले आहे की त्यांची पत्नी मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयाद दाखल करावे. अधिक तपासाअंती या वसतीगृहात पोलिस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी महिलांना नाचवल्याचा प्रकार घडलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here