इंदोर : महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश करणा-या प्रवासी नागरिकांना कोरोना निगेटीव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बैठकीदरम्यान अधिका-यांना निर्देश दिले आहे. दरम्यान जळगाव येथील हमसफर ट्रॅव्हल्स यांचेशी संपर्क साधून विचारणा केली असता अद्याप तरी प्रवासी वर्गाची अशा स्वरुपाची तपासणी सिमेवर झालेली नाही वा तशी कुठलीही सुचना आम्हाला मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोना समिक्षा बैठकीदरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की भोपाळसह, इंदोर, जबलपूर, बैतूल, छिंदवाडा, उज्जेन आणि शेजारच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. मध्य प्रदेशातील कोरोना स्थिती आटोक्यात रहावी यासाठी महाराष्ट्रातून येणा-या प्रवाशांना कोरोना निगेटीव्ह अहवाल असेल तरच बसमधे प्रवेश दिला जाईल. येत्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली नाही तर भोपाळ व इंदोर येथे रात्रीचा कर्फ्यु लावण्यात येईल.