अभिनेता मिथुनचा भाजप प्रवेश

On: March 7, 2021 2:13 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपने अभिनेता मिथुन चक्रवर्ती यास भाजप प्रवेश दिला आहे. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आहे. तत्पुर्वी मिथुन चक्रवर्ती यांचा हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी भाजपचे कैलास विजयवर्गीय, मुकुल रॉय व सुवेंदु अधिकारी आदी नेतेमंडळी हजर होती. आज सकाळीच बंगाली बाबु मिथुन चक्रवर्ती व भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट झाली होती. दोघा नेत्यांमधे पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment