मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप झाले आहेत. सचिन वाझे यांच्यावर कारवाईसह त्यांच्या अटकेची मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान केली आहे. त्यामुळे हे प्रकरण एका नव्या वळणावर आले आहे.
सचिन वाझे यांचा महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण बचाव करत आहे? असा प्रश्न विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमधे दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट त्यांच्या राजीनाम्याची तर दुसरा गट त्यांच्या बचावाची तयारी करत आहे. सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी फडणवीस यांनी केल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची तिन वेळा भेट घेतली आहे.








