गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप मंगळवारी विधानसभेत केला होता. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग प्रस्तावच सादर केला आहे.

अन्वय नाईक याची हत्या नसून आत्महत्या असल्याचे फडणवीस म्हणाले. आत्महत्येस प्रवृत्त केले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना स्पष्टपणे म्हटले असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे अन्वय नाईक प्रकरण दाबले गेल्याचे म्हणणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतांना त्या निकालाचा अवमान करणारे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केले असून आपल्यावर चुकीचे आरोप जाणूनबुजून केले जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांचे सदर वक्तव्य आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत फडणवीस यांनी हे प्रकरण विशेष हक्कभंग समीतीकडे पाठवण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here