अशोक चव्हाणांवर देखील आणणार हक्कभंग

On: March 10, 2021 3:00 PM

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विशेष हक्कभंग प्रस्ताव सादर केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील हक्कभंग आणणार आहेत. तशी माहिती माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांनी सभागृहात खोटे निवेदन दिले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच 102 ची घटनादुरुस्ती मराठा आरक्षण कायद्यास लागून होत नाही असेही फडणवीस म्हणाले. अॅटर्नी जनरल यांच्यासंदर्भातील चुकीचे वक्तव्य चुकीचे केल्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment