सचिन वाझे आता नागरी सुविधा केंद्रात

On: March 12, 2021 11:28 AM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादाच्या भोव-यात सापडले असतांना स.पो.नि. सचिन वाझे यांची बदली नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली आहे. रात्री त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. स.पो.नि. सचिन वाझे यांच्या गुन्हे शाखेतील नियुक्तीवर देखील विरोधी पक्ष भाजपने आक्षेप घेतला होता. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी स.पो.नि. सचिन वाझे वादाच्या भोव-यात सापडले आहेत. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात राजकारण पेटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment