स.पो.नि.सचिन वाझे यांची पुन्हा बदली

On: March 12, 2021 4:06 PM

मुंबई : स.पो.नि. सचिन वाझे सध्या मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चर्चेत आहेत. गुप्तवार्ता विभागातून त्यांची बदली नागरी सुविधा केंद्रात झाली होती. तसे अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले होते. मात्र आता त्यांची नव्याने एस.बी. -1 अर्थात विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. एकाच दिवसात दोनवेळा बदली झालेले स.पो.नि. सचिन वाझे सध्या मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादाच्या भोव-यात सापडले आहेत.

मुंबई स्थित प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळून आले होते. या वाहनाचा तपास सचिन वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान वाहन मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ते वादाच्या भोव-यात सापडले. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूला सचिन वाझे जबाबदार असल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर खूनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून केला गेला आहे.
हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी आरोप असतांना त्यांना त्या विभागाच्या पदावर ठेवल्यास त्यांच्याकडून पुरावे नाहीसे केले जाऊ शकतात असा दावा भाजपकडून करण्यात येत होता. अखेर वाझे यांची बदली करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment