पुणे : कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे व त्याचा साथीदारांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गुंड गजा मारणे याची त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली होती. याप्रकरणी वारजे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी आरोपींना अटक करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य केल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (48) शास्त्रीनगर), रुपेश कृष्णराव मारणे (38), सुनील नामदेव बनसोडे (40), दोघेही राहणार कोथरुड, श्रीकांत संभाजी पवार (34), गणेश नामदेव हुंडारे (39), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (36), बापू श्रीमंत बागल (34), अनंता ज्ञानोबा कदम (37), सचिन अप्पा ताकवले (32), संतोष शेलार अशी जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गजा मारणे याच्या जामिनाला सरकारी वकील अॅड. राजेश कावेडिया यांनी विरोध केला. त्यांचा युक्तिवाद न्यायमुर्तींनी मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.